Tuesday, December 30, 2008

ग्लोबल वॉर्मिंगचा फटका गिर्यारोहकांनाबर्फ कोसळतोय : हिमालयीन मोहिमा फसण्याच्या संख्येत

रूपाली पेठकर

मुंबई, ता. 14 ः हिमालयात गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांना वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसतो आहे. गेल्या काही वर्षांत गिर्यारोहणाच्या वेळी अचानक बर्फ कोसळत असल्याने गिर्यारोहकांना आपल्या मोहिमा अर्धवट सोडाव्या लागत आहेत. त्यामुळे अनेक गिर्यारोहकांचे हिमालयात गिर्यारोहण करण्याचे स्वप्न अपुरे राहत आहे.गिर्यारोहकाला हिमालयाचे उंच पर्वत आव्हान देत असतात. बर्फाने सदोदित आच्छादित असलेली हिमालयातील शिखरे पार करणे हे गिर्यारोहकाचे स्वप्न असते. या मोहिमा अत्यंत कठीण असतात. त्याच्या तयारीला सहा-आठ महिने लागतात. सराव, साधनसामग्री, पैसे, पोर्टर्स, विविध परवानग्या आणि मुख्य म्हणजे पूर्वीच्या गिर्यारोहकाच्या अहवालाचा अभ्यास आणि नकाशांची जमवाजमव आदी बाबींचा त्यात समावेश असतो.हिमालयातील प्रत्येक मोहिमेसाठी दोन ते अडीच लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. परदेशी नागारिकांना परमिटसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. यंदा (2008) 56 भारतीय, तर 65 परदेशी मोहिमा हिमालयात आखण्यात आल्या. मान्सूनपूर्व काळात सहा आणि मान्सूननंतरच्या 26 भारतीय मोहिमा अयशस्वी झाल्या; तर परदेशी गिर्यारोहकांच्या मान्सूनपूर्व पाच आणि मान्सूननंतरच्या 22 मोहिमा अयशस्वी ठरल्या. अवेळी बर्फ, पाऊस, तसेच अनेकदा काही तांत्रिक अडचणी आल्यानेही मोहिमा अयशस्वी होत असल्याचे हिमालयीन क्‍लबचे सदस्य राजेश गाडगीळ यांनी सांगितले; मात्र, सतत मोहिमा अयशस्वी होत राहिल्यास भारतीयांबरोबर परदेशी गिर्यारोहकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होईल. त्यामुळे भविष्यात मोहिमा रोडावण्याची भीती गाडगीळ यांनी व्यक्त केली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयाच्या वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बर्फाचे कडे कोसळत आहेत. मात्र गिर्यारोहण संस्था याबाबत ठोस विचार करीत नाही, अशी दुर्दैवाची बाब असल्याची खंत गाडगीळ यांनी व्यक्त केली. डोंगराळ भागातील अर्थव्यवस्था धोक्‍यातविविध मोहिमांवर जाणाऱ्या गिर्यारोहकांमुळे डोंगराळ भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असतो. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या परिसरात सुमारे किमान एक लाख कुटुंबाची उपजीविका ही या व्यवसायामुळे होते; मात्र व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्यास कुटुंबाची आबाळ होईल.

No comments:

Post a Comment