रूपाली पेठकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेन्टीटी (आयएमईआय) क्रमांक नसलेल्या चिनी मोबाईलवर भारतात येत्या 15 एप्रिलपासून बंदी घालण्यात येत असतानाही या मोबाईल फोनची विक्री बाजारात जोरात सुरू आहे. चिनी मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेण्यात येत असला, तरी लोकांमध्ये मात्र त्याबाबत जागृती नसल्याचेच यावरून स्पष्ट होते.आकर्षक मॉडेल, दोन सीम कार्ड, डिजिटल आवाज अशी वैशिष्ट्ये असलेल्या आणि खिशाला परवडणाऱ्या किमती असलेल्या चिनी मोबाईलने गेल्या वर्षभरात ग्राहकांवर चांगलेच गारूड केले आहे. सहासात महिने वापरून फेकून देऊ अशा मानसिकतेतून ग्राहकांनीदेखील या मोबाईलच्या सुमार दर्जाकडे काणाडोळा केला; मात्र देशभरात झालेल्या घातपाती कारवायांत चिनी मोबाईलचा वापर झाल्याचे उघडकीस आले आहे. आयएमईआय क्रमांकामुळे जगभरातून कुठूनही मोबाईलवरून केलेला फोन ट्रॅक करणे सोपे ठरते; मात्र देशात गेल्या वर्षभरात विकले गेलेल्या लाखो चिनी मोबाईलमध्ये आयएमईआय क्रमांकच नसल्याचे उघड झाले आहे. या मोबाईलवरून झालेले फोन ट्रॅप करून त्यांचा मागोवा घेणेही तपासयंत्रणांना कठीण ठरू लागले, त्यामुळे त्यांच्या वापरावर तसेच विक्रीवर बंदी आणावी, असे सीबीआयने केंद्र सरकारला सुचविले होते.आयएमईआय क्रमांक नसलेल्या मोबाईल्सना सेवा पुरविणे 15 एप्रिलपासून बंद करावे, असे दूरसंचार विभागाने मोबाईल सर्व्हिस पुरविणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे. तसेच सध्या आयईएमआय क्रमांक असलेले चिनी मोबाईलही बनावट असल्याचे आढळून येत आहे, त्यामुळे ग्राहकांनी विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता जागरूक होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.चिनी मोबाईलची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मुंबईतील दुकानांमध्ये फेरफटका मारला असता एका मोबाईल विक्रेत्याने एका मोबाईलला चक्क दोन आयएमईआय क्रमांक असल्याचे दाखवले. यावरून हे विक्रेते ग्राहकांची चक्क फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट होते. सरकारने चिनी मोबाईलवर बंदी घातली असली, तरी कालच शहरात कोट्यवधी रुपयांचा माल उतरला असल्याची माहिती या मोबाईल विक्रेत्याने "सकाळ'शी बोलताना दिली.
Wednesday, April 15, 2009
बीएसएनएलची नजरभारताबाहेरील कंपन्यांवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ः सध्याच्या स्पर्धात्मक युगात आता भारत संचार निगम लिमिटेडनेदेखील जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने नेपाळबरोबर करार केला आहे. सध्याच्या स्पर्धेत भविष्यात जी कंपनी भविष्यातील उत्कर्षपथावर असेल अशाच कंपनीबरोबर बीएसएनएल भागीदारी करण्यास उत्सुक असेल. यासाठी कंपनीच्या त्या उद्योगाच्या महसूल आणि व्याप्तीचा तसेच रचनात्मक नेटवर्क या निकषांवर कंपनी पुढील पाऊल टाकेल.सद्यपरिस्थित बीएसएनएल टीसीआयएलसह टुनिसिया या देशातील कंपनीबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक कुलदीप गोयल यांनी दिल्ली येथे वृत्तसंस्थेला दिली. एमटीएनएलने नेपाळ येथील कंपनीबरोबर भागीदारी केल्यानंतर सौदी अरेबिया आणि केनियासारख्या पूर्व आशियातील कंपन्यांबरोबरही अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र तो फसल्यामुळे आता बीएसएनएलने या दोन देशातील कंपन्यांवरही नजर ठेवून आहे.

निसर्गसौंदर्य न्याहळण्याची संधी लडाखला "बीएनएचएस'चा नेचर ट्रेल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मे-जून महिन्यात बर्फ वितळू लागला की हिमालयाच्या उत्तुंग पहाडांचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटकांचा मोर्चा हिमाचल प्रदेश, जिम कॉर्बेट आणि लडाखच्या वाळवंटाकडे वळतो. अशाच निसर्ग सौंदर्य आणि निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी(बीएनएचएस) या संस्थेने नेचर ट्रेलचे आयोजन केले आहे. यामध्ये खारफुटीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुंदरबन, विविध प्रकारचे जंगल आणि वातावरणात आढळणाऱ्या जिम कॉर्बेट आणि लडाखचे गार वाळवंट पाहता येणार आहे. सुंदरबनच्या ट्रेलला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून जिम कॉर्बेट आणि लडाखच्या ट्रेलची तयारी सुरू झाली आहे. जिम कॉर्बेट हे हिमालय रेंजच्या पायथ्याशी असल्याने तिथे उतारावरचे, सखल भागातले आणि तरईतले असे तीन प्रकारचे जंगल पाहायला मिळते. तेथील वनस्पती, प्राणी आणि पक्षी यांच्या जाती आणि त्यातील विविधता अभ्यासायला मिळते. लडाखच्या वाळवंटात बर्फातला बिबट्या, पुरंग, रानटी गाढव आणि तिबेटीयन कोल्हे असे प्राणी येथे पाहायला मिळतात. तर सिंधूच्या खोऱ्यात अतिशय दुर्मिळ वन्यजीवन असतात.बीनएनचएसच्या या ट्रेलमध्ये या निसर्गसौंदर्याची ओळख करून देण्यात येणार आहे. जिम कॉर्बेटला जाण्यासाठी बीएनएचएसने 22 ते 26 मे आणि 28 मे ते 1 जून अशा दोन तुकड्या केल्या आहेत. त्यासाठी आठ हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. तर लडाखसाठी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंतची एक बॅच असून त्यासाठी 26 हजार शुल्क आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः अतुल साठे 9820454262 यांच्याशी संपर्क साधावा.

Friday, January 9, 2009
गाडीतही टच-स्क्रीन एंटरटेनमेंट दूरवरचा प्रवास होणार मनोरंजक
First time in d world
as he said...
विमानात असणारी टच-स्क्रीन टीव्ही सेवा आता यापुढे चारचाकी गाडीतही उपलब्ध होणार आहे. तैवान येथील मायक्रो स्टार इंटरनॅशनल या कंपनीने ही प्रणाली तयार केली आहे. भारतात ही सेवा देण्यासाठी "फनटारो' या जगातील आघाडीच्या विपणन संस्थेने पुण्यातील डीएसके डिजिटलबरोबर करार केला आहे. आज "डीएसके फनटारो' या कंपनीने याची अधिकृत घोषणा केली. अशी सेवा देणारी ही जगातील एकमेव कंपनी असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या सेवेमुळे आता दूरचा प्रवास करणाऱ्यांना ड्रायव्हरच्या आवडीचा चित्रपट पाहत वेळ घालवावा लागणार नाही. प्रत्येकाला वेगळ्या स्क्रीनवर आपल्या आवडीचा चित्रपट पाहता येईल. त्यामुळे प्रवासही मनोरंजक होणार आहे. गाडीतील आसनांनुसार दोन, चार, सहा किंवा अगदी 60 आसनी बसमध्येदेखील प्रत्येकाच्या समोर "टच-स्क्रीन डिजिटल टीव्ही' सेवा उपलब्ध होणार आहे. तैवान येथील मायक्रोस्टार इंटरनॅशनल कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे. पुण्यातील डीएसके डिजिटल ही कंपनी भारतात वितरण आणि इन्स्टॉलेशनचे काम करणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला आपल्या आवडीनुसार कार्यक्रम पाहता येतील. शिवाय स्कीनवर गेम्सही खेळता येतील. विशेष म्हणजे त्याचा इतरांना त्रासही होणार नाही. याशिवाय या तंत्रज्ञानात युरोपियन देशांसारखा नकाशा दाखविण्यासाठी "जीपीएस' सेवेचा वापर करून नॅव्हीएशनची सुविधा उपलब्ध असेल; तर डीश टीव्हीच्या छोट्या अँटेनाच्या साह्याने लाईव्ह कव्हरेज देण्याचीही यामध्ये सोय करण्यात आली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद क्षीरसागर यांनी "सकाळ'ला सांगितले. सध्या कंपनीने टोयोटो, मर्सिडीस यांसारख्या 80 गाड्यांमध्ये ही सेवा दिली आहे. वर्षभरात 50 हजार युनिट गाड्यांमध्ये बसविण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. यासाठी तंत्रज्ञानात आठ जीबीची रि-राईटेबल हार्ड-डिस्क वापरण्यात येणार आहे. सात इंचाच्या एलसीडी टच-स्क्रीनवर चित्रपट पाहता येईल. तसेच इन्स्टॉलेशन झाल्यावर त्याची वर्षभराची वॉरंटीदेखील दिली जाणार आहे. भारतासह जगभरातील 45 देशांमध्ये असे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरले जात असल्याचा दावा यावेळी क्षीरसागर यांनी केला. याबाबत अधिक माहितीसाठी enquiry@dskdigital.com या संकेतस्थळावर लॉगऑन करता येईल.

Tuesday, December 30, 2008
ग्लोबल वॉर्मिंगचा फटका गिर्यारोहकांनाबर्फ कोसळतोय : हिमालयीन मोहिमा फसण्याच्या संख्येत
रूपाली पेठकर
मुंबई, ता. 14 ः हिमालयात गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांना वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसतो आहे. गेल्या काही वर्षांत गिर्यारोहणाच्या वेळी अचानक बर्फ कोसळत असल्याने गिर्यारोहकांना आपल्या मोहिमा अर्धवट सोडाव्या लागत आहेत. त्यामुळे अनेक गिर्यारोहकांचे हिमालयात गिर्यारोहण करण्याचे स्वप्न अपुरे राहत आहे.गिर्यारोहकाला हिमालयाचे उंच पर्वत आव्हान देत असतात. बर्फाने सदोदित आच्छादित असलेली हिमालयातील शिखरे पार करणे हे गिर्यारोहकाचे स्वप्न असते. या मोहिमा अत्यंत कठीण असतात. त्याच्या तयारीला सहा-आठ महिने लागतात. सराव, साधनसामग्री, पैसे, पोर्टर्स, विविध परवानग्या आणि मुख्य म्हणजे पूर्वीच्या गिर्यारोहकाच्या अहवालाचा अभ्यास आणि नकाशांची जमवाजमव आदी बाबींचा त्यात समावेश असतो.हिमालयातील प्रत्येक मोहिमेसाठी दोन ते अडीच लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. परदेशी नागारिकांना परमिटसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. यंदा (2008) 56 भारतीय, तर 65 परदेशी मोहिमा हिमालयात आखण्यात आल्या. मान्सूनपूर्व काळात सहा आणि मान्सूननंतरच्या 26 भारतीय मोहिमा अयशस्वी झाल्या; तर परदेशी गिर्यारोहकांच्या मान्सूनपूर्व पाच आणि मान्सूननंतरच्या 22 मोहिमा अयशस्वी ठरल्या. अवेळी बर्फ, पाऊस, तसेच अनेकदा काही तांत्रिक अडचणी आल्यानेही मोहिमा अयशस्वी होत असल्याचे हिमालयीन क्लबचे सदस्य राजेश गाडगीळ यांनी सांगितले; मात्र, सतत मोहिमा अयशस्वी होत राहिल्यास भारतीयांबरोबर परदेशी गिर्यारोहकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होईल. त्यामुळे भविष्यात मोहिमा रोडावण्याची भीती गाडगीळ यांनी व्यक्त केली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयाच्या वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बर्फाचे कडे कोसळत आहेत. मात्र गिर्यारोहण संस्था याबाबत ठोस विचार करीत नाही, अशी दुर्दैवाची बाब असल्याची खंत गाडगीळ यांनी व्यक्त केली. डोंगराळ भागातील अर्थव्यवस्था धोक्यातविविध मोहिमांवर जाणाऱ्या गिर्यारोहकांमुळे डोंगराळ भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असतो. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या परिसरात सुमारे किमान एक लाख कुटुंबाची उपजीविका ही या व्यवसायामुळे होते; मात्र व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्यास कुटुंबाची आबाळ होईल.

hallo
Hi frinds now v ll meet through this blog
share me your experiance about trek and new destinations, photographs and and mobile phones

Subscribe to:
Posts (Atom)